पवना थडी जत्रा स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. या जत्रेत महिला बचतगटांनी स्टॉलसाठी 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन, महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. यावर्षी पवनाथडी जत्रा 4 ते 8 जानेवारी 2018 या कालावधीत सांगवीतील पी.डब्लू.डी. मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे.

महापालिकेत अर्ज उपलब्ध
महापालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते. बचतगटांच्या उत्पादनांची सर्वांना माहिती व्हावी. बचतगटातील महिलांना विक्री कौशल्ये ज्ञात व्हावे. यासाठी वस्तू विक्रीकरिता पवनाथडी जत्रेत स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महिला बचतगटांनी स्टॉलसाठी 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यातील अर्ज नागरवस्ती विकास योजना विभाग, महापालिका, पिंपरी या ठिकाणी वाटप करण्यात येत आहेत.

बचतगटांनाच प्रवेश
तसेच संपूर्ण भरलेले अर्ज स्वीकृतीही करण्यात येईल. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. स्टॉलाठी फक्त महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनीच अर्ज करावेत, असेही पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.