खासदार श्रीरंग बारणे यांचा उपक्रम
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्या पवना धरणातील पाणीसाठा वाढवण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून सलग तिसर्या वर्षी गाळ काढण्याच्या कामास गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. मागील दोन वर्षात धरणातून 75 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून, त्यामुळे धरणात 45 दिवस पुरेल एवढा अतिरिक्त पाणीसाठी उपलब्ध झाला आहे.गाळ काढण्याचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. धरणातील गाळ काढण्याच्या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता नानासाहेब मटकरी, शाखा अधिकारी मनोहर खाडे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका 490 एम.एल.डी व एमआयडीसी 100 एम.एल.डी.सी पाणी धरणातून पाणी उचलते. पिंपरी-चिंचवड बरोबर तळेगांव, देहूरोड, शहर आणि शहराबाहेरी उद्योग आणि मावळमधील शेतकर्यांना पवना धरणातून पाणीसाठा केला जातो. दिवसेंदिवस भासणारी पाणीटंचाई रोखण्यसाठी आणि धरणातील पाणीसाठा वाढवण्यासाठी पवना धरणामध्ये साठलेला गाळ काढणे आवश्यक होते. खासदार बारणे यांनी यासंर्दभात महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केला. मात्र पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांच्यात हद्द व कार्यक्षेत्राच्या वादात हे काम सुरु होऊ शकले नाही
खासदार बारणे यांनी स्वतः पुढाकार घेत गेल्या तीन वर्षापासून खासदार स्थानिक विकास निधीतून हे काम सुरु करण्यात आले. या कामासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. महसूल पाटबंधारे विभागाती मदत मिळाली.दोन वर्षात धरणातून 75 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून, धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला.धरणात दीड महिना पुरेल इतका अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. याचा फायदा शहरवासियांसोबतच तलेगाव देहूरोडसोबतच स्थानिक शेतकर्यांनाही झाला आहे.