पवना धरण परिसरात 24 तासात 132 मिमी पाऊस

0

पिंपरी-चिंचवड :शहराची तहान भागविणार्‍या पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 132 मिमी पाऊस पडला आहे. तर, 1 जूनपासून 729 मिमी पाऊस पडला असून सव्वा सात टक्यांनी धरणातील साठयात वाढ झाली आहे. आजमितीला धरणात 31.92 टक्के पाणीसाठा झाला असून हा पाणीसाठा दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ पुरेल एवढा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रात 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. आजमितीला धरणात 31.92 टक्के पाणीसाठा झाला आहे.

पाणी कपातीचे संकट टळेल
जून महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडला होता. त्यामुळे शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, मागील सहा दिवसांपासून या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. शहरवासियांना पिण्याचे पाणी देणारा एकमेव स्त्रोत असलेल्या पवना धरणात गेल्या 24 तासात 132 मिमी पाऊस पडला आहे. तर, 1 जूनपासून 729 मिमी पाऊस पडला असून यंदाच्या पावसाळ्यात धरणात 11.76 टक्यांनी धरणातील साठयात वाढ झाली आहे. सध्या धरणात 32 टक्के पाणीसाठा झाला असून हा पाणीसाठा शहराची दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापर्यंत तहान भागविणार आहे.