पवना नदीची अव्याहत स्वच्छता

0

पिंपरी : संक्रातीच्या दिवशीही रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे पवनामाईची स्वच्छता करण्यात आली. सलग 71 व्या दिवशी पवना नदी पात्रातून 250 ट्रक जलपर्णी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. तर रविवारच्या उपक्रमामध्ये पाच ट्रक जलपर्णी काढली आहे. या उपक्रमाला रोटरी पिंपरी टाऊनतर्फे सदस्यांनी प्रत्येकी 5 हजार, गोपाळ अप्पा झेंडे 5 हजार, बाळासाहेब वाल्हेकर 5 हजार अशी 30 हजारांची मदत संकलन कलशात जमा केली. यावेळी ‘अंघोळीची गोळी’चे मुख्य प्रवर्तक, ‘मी पाणी’ या संस्थेचे सर्वेसर्वा माधव पाटील पुणे येथून उपस्थित होते. नवनाथ ढवळे यांनी मकर संक्रांतीनिमित्त नदीवर आज केक कापून स्वच्छ झालेल्या नदीवरती आनंद व्यक्त केला. पुढच्या रविवारी (दि.21) जांबे घाटावर जलपर्णी काढण्यात येणार आहे.