सहप्रवासी जखमी ; रावेर-वाघोड स्थानकादरम्यानची घटना
रावेर- डाऊन पवन एक्स्प्रेसमधून पडल्याने परप्रांतीय प्रवासी मयत झाल्याची घटना रावेर ते वाघोड रेल्वे स्टेशनदरम्यान घडली. या घटनेत अन्य दुसरा प्रवासीदेखील खाली पडल्याने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. समजलेल्या माहितीनुसार मनीषकुमार यादव (दरभंगा) यांचा मृत्यू झाला असून नरेशकुमार यादव (दरभंगा) हा सहप्रवासी जखमी झाला. गर्दीच्या हंगामामुळे रेल्वे गाड्यांना तोबा गर्दी वाढली आहे. रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.