शिरगाव : पवन मावळात सध्या कांदा लागवडीच्या कामाला वेग आल्याचे चित्र या भागात दिसत आहे.राज्यातील बर्याच जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.त्यामुळे राज्यात कांद्याचे एकूण उत्पादन कमी होईल.त्यामुळे जे या महिन्यात कांदा लावला तर ऐनवेळी काढणीस येयील आणि पर्यायाने भाव चांगला मिळेल आणि चांगली आमदनी होईल या उद्देशाने शिरगाव, गोडूंब्रे, साळुंब्रे, दारुंब्रे, सांगवडे, गहुंजे,आदी भागातील शेतकर्यांनी आपल्या भात निघालेल्या शेतात किंवा ज्वारीसाठी ठेवलेल्या शेतात कांदा लागवड करण्याचे ठरवून कांदा लागवड सुरु केली आहे.
हे देखील वाचा
कांदा हे पिक साडेतीन ते चार महिन्यात काढणीसाठी येते म्हणजे या आठवड्यात लावलेला कांदा एप्रिल किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात काढणीस येयील.त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बाजार भाव चांगला येयील या हेतून काही शेतकर्यांनी जास्त क्षेत्रावे कांद्याची लागवड केली आहे.याविषयी कासारसाई येथील शेतकरी सोपानराव जरे याना विचारले असता त्यांनी सांगितले आम्ही पूर्वी एक एकर कांदा लावणार होतो परंतु पुढील परिस्थितीचा अंदाज घेता यावर्षी दोन एकर कांदे लावणार आहोत काही क्षेत्रावर लागवड चालू केली आहे उर्वरित शेतातही कांदाच लावणार आहोत.