मुंबई : काल शुक्रवारी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात सभा घेतली. हा विषय संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरला आहे. सर्वत्र कौतुक होत असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही देखील शरद पवारांचे कौतुक केला आहे. शरद पवारांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र असे असले तरी एकीकडे आदित्य ठाकरे शरद पवारांचे कौतुक करत असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे. “तेव्हा जर 70 कोटींचा भ्रष्टाचार केला नसता तर तुम्हाला पावसात भिजायची वेळ आली नसती,” अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पवारांवर निशाणा साधला.
मुंबईत आज पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या सरी सुरु असतानाच मुंबईतील धारावीमध्ये आदित्य ठाकरेंचा रोड शो झाला. यावेळी त्यांनी शरद पवारांनी भर पावसात केलेल्या भाषणाचे कौतुक केले. आदित्य ठाकरेंच्या या रोड शोमध्ये सलमान खानचा बॉडीगार्ड शेराही सहभागी झाला होता. आजच त्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.