राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला खुलासा
हे देखील वाचा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिनचीट दिल्यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र शरद पवार यांनी मोदींना क्लिनचीट दिलेली नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले आहे. राफेलच्या व्यवहाराविषयी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत जनतेला कुठलीही शंका नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने राफेलच्या किंमती जाहीर कराव्यात आणि पुढील चौकशीसाठी हे प्रकरण संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. राफेल खरेदी प्रकरणात लोकांना मोदींबाबत कुठलीही शंका नाही. विमानाशी संबंधित तांत्रिक गोष्टी उघड करण्याची विरोधकांची मागणी चुकीची असल्याचे पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.