पवारांचा संबंध असल्यानेच ईडीने गुन्हा दाखल केला; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट !

0

मुंबई: शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह अजित पवार आणि इतर नेत्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. स्वत: शरद पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचे ठरवले होते. मात्र त्यानंतर त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाणे रद्द केले. शरद पवारांचा संबंध नसताना ईडीने गुन्हा दाखल केल्याचे आरोप होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे. ईडीचा गुन्हा सरकारने नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाला आहे. कर्ज देताना बँकेत वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले जायचे, काही कर्ज शरद पवारांच्या निर्देशानुसार देण्यात आले असल्याचे नमूद असल्यानेच शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केले.

मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या आरोपावर शरद पवारांनीही प्रत्युत्तर दिले आहे. मी कधीही कोणत्याही संस्थेला पत्र दिलेले नाही. जर मी पत्र दिले असेल तर त्याची चौकशी व्हावी असे सांगत शरद पवारांनी हे आरोप फेटाळले.