पवारांच्या पक्षाचेच नाव राष्ट्रवादी, त्यांचात राष्ट्रवाद कोठेही नाही : मोदी

0

अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रच्रासाठी राज्यात सभा घेत आहे. प्रत्येक सभेत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष करीत असून त्यांच्यावर टीकेचा भडीमार करत आहे. दरम्यान आज देखील त्यांची अहमदनगर येथे सभा सुरु असून यावेळी देखील त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने फुटिरतावाद्यांशी हातमिळवणी केली आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने हेच काम केले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाही. मात्र, शरद रावांना काय झाले आहे, त्यांचा राष्ट्रवाद गेला कुठे? केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच त्यांनी पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आज मोदी नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली.