पुणे : पवार खानदान मला हरवू शकत नाही असे जोरदार प्रत्त्युत्तर शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांना दिले.
पवार साहेबांनी सांगितले तर शिरूर लोकसभा मतदार संघातून लढण्याची तयारी असल्याची घोषणा अजित पवार यांनी रविवारी केली होती. मी पवारांची औलाद आहे. शंभर टक्के निवडून येणारच असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्याचा समाचार घेताना आढळराव म्हणाले की, ते पवारांची औलाद असतील तर, मी मराठ्यांची औलाद आहे. लिंबुटिंबूशी लढण्यात मला स्वारस्य नाही. पण, ते लढायचं म्हणतच असतील तर त्यांनी माझ्याविरूद्ध लढून दाखवावेच असे प्रतीआव्हान आढळरावांनी त्यांना दिले.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघ पवार, आढळराव जुगलबंदीमुळे गाजू लागला आहे. आढळराव पाटील हे कल्पक उद्योजक असून शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार आहेत. त्यांना आव्हान देण्यात आल्याने सर्व जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागणार आहे.