पवार, तटकरेंचा जिल्हा दौरा;पूर्वतयारीची बुधवारी बैठक

0

जळगाव । राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधान मंडळ पक्षाचे नेते आमदार अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे , जिल्हा प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील व पक्षाच्या सेलचे राज्यस्तरीय अध्यक्ष गुरुवार दि. 13 जुलै रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून दौर्‍यांच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दि. 5 रोजी दु. 1 वाजता जिल्हा कार्यालयात आयोजित केली आहे. जिल्ह्यातील सर्व माजी आमदार, खासदार,जि.प. सदस्य, न.पा. सदस्य, पंचायत सभापती, नगराध्यक्ष, मनपा सदस्य, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष युवक महिला, सेवादल,युवती, विद्यार्थी फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी विविध सेलचे पदाधिकारी वेळेवर बैठकीस उपस्थितीचे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.