पवित्र नात्याला नवी ओळख

0

घाटकोपर (निलेश मोरे) | रक्षा बंधन अर्थात बहीण आणि भावाचा पवित्र सण. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन. हा सण उत्तर भारतात राखी म्हणून प्रसिद्ध आहे. बहीण भावाचं नातं सांगणारा हा सण एक आठवड्यावर आला आहे. आणि सर्वत्र राखी खरेदी करण्यासाठी बहिणीची आसुसता राखी घेण्याकडे वळलेली आहे. बहीण भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून दीर्घ आयुष्य आणि सुख लाभो अशी प्रार्थना करते व भाऊ तिला वचन देतो. पुरातन काळात स्त्रिया स्वतःला असुरक्षित मानत तेव्हा त्या स्त्रिया एकाद्या व्यक्तीला हातात राखी बांधून संरक्षणासाठी प्रार्थना करत. बहीण भावाचा पवित्र समजला जाणारा हा सण दरवर्षी नवीन स्वरूप घेत आहे. पू

र्वी रंगबिरंगी गोंड्यांची बनवलेली राखी बहीण भावाच्या हाताला बांधत असे परंतु गोंड्यांची राखी आता पूर्णपणे विरळून गेली आहे. अर्थात ती बाजारात जरी मिळत असली तरी बहुतांश त्या राखीची खरेदी केली जाते मात्र वर्षानुवर्षे राखी मध्ये देखील बदल होत असताना दिसून येत आहे. बाजारात विविध स्वरूपातल्या राख्या आता आपल्याला बघायला मिळत आहेत. बाहुबली, छोटा भीम, मोठू पतलू, बालगणेश, बजरंगी भाईजान या नावाच्या राख्या आपल्याला बाजारात बघायला मिळत आहेत. छोट्या छोट्या चिमुकल्यांसाठी तर छोटा भीम, बालगणेश, मोठू पतलू या राख्यां बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. या विविध प्रकारच्या राख्यांची किमंत 15 ते 20 रुपये इतकी आहे. बाजारात आलेल्या या राख्याना खरेदी करणाऱ्या महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे राखी विक्रेते सांगत आहेत .

राखी हा बहीण भावाचा पवित्र सण आहे. या नात्याला घट्ट करण्यासाठी प्रत्येक वर्षी बहीण भावाला राखी बांधून प्रार्थना करते. बहीणीसाठी आपला भाऊराया हा हिरोच असतो. मी बजरंगी भाईजानची राखी घेतली आहे. माझा भाऊ माझ्यासाठी बजरंगी आहे.
– पूनम पवार