पशुधन पर्यवेक्षक १८०० रूपयाची लाच घेतांना रंगेहात पकडला

0

जळगाव । जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील शेतकर्‍याच्या बैलाच्या जखमी शिंगावर उपचार करण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक यांनी 1 हजार 800 रूपयाची मागणी केली असता त्यात शेतकरी यांच्याकडून पशुधन पर्यवेक्षक 1 हजार 800 रूपये स्विकारतांना अ‍ॅन्टी करप्शन ब्यरो पथकाने रंगेहात पकडले असून डॉक्टर विरोधात भ्रष्टाचार संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील शेतकरी असून शेती काम करण्यासाठी बैलजोडी आहे. यातील एका बैलाचे शिंग काम करतांना अडकल्याने तुटले. त्यानुसार त्यानी 10 दिवसांपुवी पशु वैद्यकिय दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षक डॉ. योगेश पाटील यांनी बैलाच्या शिंगावर उपचारासाठी ऑपरेशन करण्याकरीता 1 हजार 800 रूपये खर्च लागेल असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार शेतकरी यांची तक्रार नोंदवून तक्रारीची पडताळणीसाठी पथकाने 7 फेब्रुवारी रोजी पशु वैदकिय दवाखान, मोयखेडा दिगर येथे सापळा रचून पशुधन पर्यवेक्षक डॉ. योगेश पाटील हे तक्रारदारकडून 1हजार 800 रूपयाची रक्कम स्विकारतांन रंगेहात पकडले. याबाबत त्याच्यावर जामनेर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास अ‍ॅन्टी करप्शन ब्यरोचे कर्मचारी करीत आहे.