धुळे । पदवीधारक खाजगी पशुवैद्यकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी 20 रोजी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह पशुसंवर्धन मंत्र्यांना जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन आणि दुग्ण व्यवस्थापन संवा संघाचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील, सल्लागार सचिव डॉ.संजय पाटील, विभागीय अध्यक्ष डॉ.दीपक पाटील, सचिव डॉ.अक्षय धनगर, कार्याध्यक्ष डॉ.योगेश कोळी, कार्याध्यक्ष डॉ.पंकज शिंदे यांच्यासह पशुवैद्यक, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाचे पदाधिकारी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
पशूवैद्यकांचा लाभ वाढवावा
9 ऑगस्ट 2009 च्या अधिसुचनेनुसार राज्यात 1 लाखाहून अधिक बेरोजगार प्रशिक्षीत पदवीधारक खाजगी पशुवैद्यक सेवारत आहेत. शासनाच्या 1983 व 2003 च्या निर्णयानुसार आवश्यक तो अभ्यासक्रम पुर्ण करून हे पशुवैद्यक सेवा देत असतांना पशुवैद्यकांवर अन्याय होत आहे. त्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर व धुळ्यात अर्धनग्न आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. तरीही न्याय मिळालेला नाही. पशुवैद्यकांसाठी स्वतंत्र नोंदणी असावी, 13 वर्षांपासून बंद असलेली पशुधन पर्यवेक्षक भरती सुरु करावी, गाव तेथे मानद पशुवैद्यक योजना राबवावी, खाजगी पशुवैद्यकांना पदवीची अट वगळण्यात यावी, व्यवसाय-उद्योगासाठी आर्थिक तरतूद करावी, 12 वी विज्ञाननंतर पशुचिकित्सा शास्त्र पदविका अभ्यास सुरु करावा आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.