पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष म्हणतात, ममता बॅनर्जी होऊ शकतात पहिल्या बंगाली पंतप्रधान !

0

कोलकाता-पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची स्तुती केली आहे. त्याने एक विधान केले आहे त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी पहिल्या बंगाली पंतप्रधान होऊ शकतात असे विधान भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी केले आहे.

काल ममता बॅनर्जी यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देतांना त्यांनी हे वक्तव्य केले. पश्चिम बंगालमधून ज्योती बसू पंतप्रधान होऊ शकले असते, मात्र त्यांच्या पक्षाने तसे होऊ दिले नाही. मात्र ममता बॅनर्जी पंतप्रधान होऊ शकतात असे ते म्हणाले.