पश्चिम बंगाल आणि ओडीसात भाजपची सत्ता येणार-भाजप

0

नवी दिल्ली-देशभरात भाजपची वाढती लोकप्रियता आणि विस्तार यामुळे आगामी काळात पश्चिम बंगाल आणि ओडीसामध्ये देखील भाजप सत्ता स्थापन करणार आहे असा दावा भाजपतर्फे करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनेर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाची सत्ता आहे, तर ओडीसात नवीन पटनायक हे मुख्यमंत्री आहे. या दोन्ही ठिकाणी सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनेर्जी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. मागील आठवड्यात सीबीआय आणि पोलीस प्रशासन यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. यावरून बरेच राजकारण रंगले आहे.