पश्‍चिम बंगालमध्ये मंदिराचा भाग कोसळून चौघांचा मृत्यू

0

परगना- पश्चिम बंगालमधील परगना जिल्ह्यातील कोचुआ गावात बाबा लोकनाथ मंदिरात जन्माष्टमीच्या उत्सव सुरु होता. यावेळी मंदिराचा काही भाग कोसळल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये चार जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बाबा लोकनाथ मंदिरात कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवासाठी अनेक भाविक मंदिरात आले होते. उत्सव सुरू असतानाच अचानक मंदिराचा भाग कोसळला. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झालेत. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेचे शोक व्यक्त केला आहे. मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची तर गंभीर जखमी झालेल्यांना एक लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 50 हजार रूपयांची मदत पश्चिम बंगाल सरकारने जाहीर केली आहे.