पश्‍चिम रेल्वे मार्गावर नऊ दिवस राहणार गाड्यांचा मेगा ब्लॉक

0

भुसावळ । मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या रॅक्सच्या दुरुस्तीच्या कामासाठी तसेच रेल्वे क्षेत्रातील इतर संबंधित कामांसाठी 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान मेगा ब्लॉक करण्यात आला आहे. या मार्गावरील तांत्रिक दुरुस्ती होईपर्यंत रेल्वे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आल्यामुळे सहा पॅसेंजर गाड्यांवर परिणाम झाला असून त्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांसह चाकरमान्या वर्गाचे हाल होणार आहे.

विशेष गाड्यांचे थांबे याप्रमाणे
या तिनही गाड्या मार्गात ठाणे, कल्याण, इगतपूरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर , शेगाव, अकोला, बडनेरा, चंद्रपूर, धामणगाव, फुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंधी आणि अजनी या स्थानकांवर थांबणार आहे. गाडी क्र. 01030 नागपूर-पुणे ही 30 रोजी रात्री 11 वाजता पुणे स्थानकाकडे रवाना होईल. ती मार्गात अजनी, सिंधी, सेवाग्राम, वर्धा, फुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बदलापूर, अहमदनगर, दौंड येथे थांबा घेणार आहे.

मुंबई- नागपूर दरम्यान विशेष गाड्या
मध्य रेल्वेतर्फे मुंबई – नागपूर आणि नागपूर – पुणे स्थानकादरम्यान विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. गाडी क्र. 01017/ 18 लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई – नागपूर अतिजलद आरक्षित गाडी ही गाडी 29 रोजी रात्री 12.05 वाजेला मुंबई येथून सुटेल आणि नागपूर स्थानकावरून ही गाडी दुपारी 1 वाजून 55 मिनीटांनी सुटेल. गाडी क्र.01011/12 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई- नागपूर सुपरस्ट एक्सप्रेस या गाडीचे सर्व डबे अनारक्षित असतील. ही 30 रोजी रात्री 12.20 वाजेला मुंबईहून नागपूरकडे रवाना होईल. तर त्याच दिवशी रात्री 9.30 वा. नागपूरहून मुंबईकडे रवाना होईल. गाडी क्र. 01075 मुंबई सीएसटी नागपूर ही 29 रोजी सायंकाळी 4.30 वा. मुंबईहून नागपूरकडे रवाना होईल.

या गाड्यांचा समावेश
रेल्वे प्रशासनातर्फे रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 59013 डाऊन सुरत भुसावळ पॅसेंजर 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, 59014 अप भुसावळ – सुरत पॅसेंजर 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 19025 डाऊन सुरत- अमरावती एक्सप्रेस 24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, 19026 अप अमरावती-सुरत एक्सप्रेस 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 59077 डाऊन सुरत-भुसावळ पॅसेंजर 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, 59078 अप भुसावळ-सुरत पॅसेंजर 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान हि गाडी रद्द करण्यात आली आहे.