पश्‍चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे गेट पाच दिवस बंद

0

भुसावळ : तांत्रिक दुरुस्तीच्या कारणामुळे पश्‍चिम रेल्वे मार्गावरील जळगाव-पाळधी असलेले रेल्वे गेट क्रमांक 148 12 ते 17 मार्च दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातून प्रवास करणार्‍या वाहनधारकांनी या सूचनेची नोंद घेऊन गैरसोय टाळावी, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे. रेल्वे प्रशासनातर्फे या ठिकाणी तांत्रिक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.