पसार आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणातील पसार आरोपीच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शिवा ज्ञानसिंग भोसले (22, रा.पंधरा बंगला, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

पसार आरोपीच्या मुसक्या आवळल्या
एकावर भोसले काठीने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात संशयीत भोसले विरोधात भादंवि 326, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शरीफोद्दीन काझी व प्रशांत लाड आदींच्या पथकाने संशयीतीला रविवारी रात्री 12 वाजेनंतर अटक केली.