जळगाव : प्रेम प्रकरणातून घरात पसार झालेल्या युगुलाला पसार होण्यापूर्वीच अमळनेर रेल्वे स्थानकावर सतर्क रेल्वे सुरक्षा बलाने पकडले आहे. धुळे येथून हे युगूल पसार झाल्याचे सांगण्यात आले. रविवारी उभयंतांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
संशयास्पद हालचालीवरून कारवाई
अमळनेर रेल्वे स्टेशनवर रविवारी दिवशी हे प्रेमीयुगूल बसले असतांना त्यांची हालचाल गस्तीवरील आरपीएफचे सहायक पोलिस निरीक्षक कुलभूषणसिंग चौहान, कॉन्स्टेबल सुभाष कुमार, कॉन्स्टेबल नीलम बैरागी यांना संशयास्पद वाटले. चौकशीदरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसी खाक्या बघून आपण धुळे येथील असल्याचे सांगत पळून आल्याचे दोघांनी कबुल केले.
युगूल पालकांच्या ताब्यात
आरपीएफ पथकाने धुळे पोलिसांसोबत संपर्क साधला असता तरुणी बेपत्ता असल्याची माहिती दिली. बेपत्ता तरुणीच्या पालकांना धुळे पोलिस स्टेशनला बोलावून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ओळख पटवण्यात आली. तरुण व तरुणीच्या पालकांना बोलावून ओळख पटवून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे हे युगूल सुरतला जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले तर उभयंतांकडे अवघे दोनशे रुपयेच असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.