नवी दिल्ली । लातूर एक्स्प्रेसचा वाद दिल्लीपर्यंत पोहोचल्यावर लातूर-मुंबई एक्स्प्रेस लातूरपर्यंतच ठेवण्याची मागणी अमान्य करण्यात आली. मात्र, 1 जुलैपासून बिदर- मुंबई एक्सप्रेस या नव्या रेल्वेला मंजुरी देण्यात आली आहे. ही रेल्वे दररोज धावणार आहे. मात्र ती लातूरपर्यंतच असावी अशी मागणी करत लातूरकरांनी आंदोलन केले होते. लातूरची ट्रेन बिदरला पळवली असा जो प्रचार होतो, त्याला उत्तर म्हणून यशवंतपूरहून बिदरला येणारी ट्रेन आता लातूरपर्यंत वाढवली जाणार आहे.