पहिली प्रवेशाचे वय ५ वर्षे करणार नाही-शिक्षणमंत्री

0

नागपूर-पहिली प्रवेशाचे वय ६ वर्षावरून ५ वर्षे करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेत आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले. यावर उत्तर देतांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पहिली प्रवेशाचे वय ६ वर्षावरून ५ वर्षे केले जाणार नाही असे सांगितले. पूर्वीपासून पहिली प्रवेशाचे वय ६ वर्षे असल्याने ते कायम ठेवण्यात येईल असे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले.