पहिले वहिले ‘माझा मोरया’ आरती अ‍ॅप

0

नेरुळ । गणेशोत्सव म्हंटले की मूर्तींपासून ते सजावट तसेच सर्वात मुख्य असलेले पूजा विधी साहित्य व पौरोहित्य. यातील पूजेसाठी भटजी मिळवणे व वेळेवर पूजेचे साहित्य मिळणे यासाठी बरीच धावपळ करावी लागते. याच कल्पनेने सिवूड्स येथे असणार्‍या ’माझा मोरया’ या गणेशमूर्ती विक्री करणार्‍या दोन तरुणांनी पहिले वहिले ’माझा मोरया’आरती संग्रह ऍप बनवले आहे. सर्व अँड्रॉइड फोनवर हे ऍप डाऊनलोड करता येणार असून, यात गणेशाच्या सर्व आरती उपलब्ध आहेत. एक क्लिकवर भक्तांना आरती उपलब्ध होणार असून; दरवर्षी गणेशोत्सवात शोधाव्या लागणार्‍या आरती पुस्तकांपासून त्यामुळे सुटका होणार आहे.

असे आहेत अ‍ॅपचे फायदे
5 ऑगस्ट रोजी हे ऍप ’माझा मोरया’ या नावाने प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे. कोणासही सहज उपलब्ध होणार आहे. यात बाप्पा याबरोबरच सर्व देवांच्या आरत्या उपलब्ध आहेत. यामुळे पुस्तकांची शोधाशोध यातून मात्र बाप्पांच्या भक्तांची सुटका होणार आहे.तसेच या ऍपमध्ये सर्व प्रकारच्या पूजाविधी देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशचतुर्थीला भटजींची होणारी शोधाशोध, त्यांचे वधारलेले भाव व त्यांची पहावी लागणारी वाट आणि त्याच घाईत त्यांच्याकडून उरकणारी गणेश स्थापना व उत्तर पूजा यासाठी उत्तम पर्याय म्हणून या ऍपचा उपयोग गणेशाच्या स्थापनेसाठी व उत्तर पूजा घाईत न करता व्यवस्थित करता येणार आहे.