अजमेर। कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जातीवरून आणि गोत्रावरून नेहमीच चर्चा असते. दरम्यान काल राजस्थानमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी पुष्कर सरोवर येथे पूजा केली. यावेळी पुजाऱ्याने राहुल गांधी दत्तात्रेय गोत्राचे असून ते काश्मिरी ब्राह्मण आहे असा दावा केला आहे. पुजारी दीनानाथ कौल यांनी पत्रकारांना माझ्याकडेगांधी कुटुंबियांचा पूर्ण रेकॉर्ड असल्याचे सांगितले. त्यात त्यांच्या परिवाराची वंशावळ आहे असे पुजारी यांनी सांगितले. समाचार जगत या दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे.
पुजारी यांच्या दाव्यानुसार त्यांचे पूर्वज मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनी याठिकाणी पूजा केली होती असे सांगितले आहे.
पूजेसाठी आलेल्या राहुल गांधी यांना मी त्यांचा गोत्र विचारला असता त्यांनी दत्तात्रेय गोत्र सांगितले. दत्तात्रेय कौल असतात ते काश्मिरी ब्राह्मण आहेत असे पुजारी यांनी सांगितले आहे.