पिंपरी :- पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावावी, या मागणीसाठी ‘पीसीसीएफ’सह विविध संघटनांतर्फे रविवारी निगडी येथे मानवी साखळी करून शांततेत निदर्शने करण्यात आली. निगडीतील टिळक चौकात सायंकाळी चार वाजता मानवी साखळी करण्यात आली होती. त्यामध्ये सहभागी विविध सामाजिक संघटनांनी शांततेत निदर्शन केले. या माध्यमातून लोकप्रतिनिधींचे या मागणीकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. पुणे महामेट्रोचे काम पिंपरीपर्यंत सुरु आहे. तथापि, पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावावी, अशी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची मागणी आहे.
केंद्राची मान्यता नाही…
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने फेब्रुवारी 2019 मध्येच मान्यता दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. परंतु, 11 महिन्याचा कालावधी झाला. तरी, देखील केंद्र सरकारने या अहवालाला मंजुरी दिली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाची भावना आहे. पिंपरी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाची नितांत गरज आहे. अकरा प्रभाग असलेला निगडी परिसर दाट लोकवस्तीचा भाग आहे. निगडीपर्यंतच्या मेट्रोला केंद्र सरकारने तातडीने मंजुरी द्यावी. या प्रमुख मागणीसाठी मानवी साखळी करण्यात आली होती.
विविध संघटनांचा सहभाग…