मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट काल २८ डिसेंबरला रिलीझ झाला. रोहित शेट्टीचे दिग्दर्शन अन् रणवीरच्या अॅक्शनने प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणलं. पहिल्याच दिवशी ‘सिम्बा’ने २० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
ऑस्ट्रेलियातही या चित्रपटाने ८८.५८ लाखांची कमाई केली आहे. भारतात हा चित्रपट ४०२० स्क्रीनवर तर जगभरात ९६३ स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.