पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस; मोदी, उद्धव ठाकरेंची एकत्र सभा

0

मुंबई : 17 व्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ११ तारखेला होणार आहे. आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी ५ वाजता संपणार आहे. दरम्यान आज शिवसेना -भाजपा युतीची संयुक्त प्रचार सभा लातूरच्या औसा येथे आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहे.

औसा हा लातूर जिल्ह्यातील तालुका असला तरी तो उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो. उस्मानाबाद लोकसभेची जागा ही शिवसेना लढत आहे. तर औसा हा लातूर जिल्ह्यात येत असला तरी तो लातूर लोकसभेच्या सीमेवर येतो. त्यामुळे एकाच सभेतून दोन मतदार संघांचा दौरा आटोपणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहेत.