पहिल्या दिवशी कांगारू 300 धावात गारद

0

धर्मशाळा । भारत व कांगारू यांच्यातील या मालिकेतील अंतिम कसोटीत पहिल्या डावात भारताचा नविन गोलंदाजाच्या फिरकीवर कांगारूच्या फलंदाजाची दैना उडविली.कांगारूचा पहिला डाव 88 षटकात सर्वबाद 300धावा केल्या.यामध्ये कर्णधार स्टीव्हन स्मिथ याचे शानदार 111 धावा केल्या. तर सलामीवीर डेविड वॉर्नरसह (56) यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने (57) झळकवलेल्या अर्धशतकामुळे कांगारूंनी तीनशेची मजल मारली.कांगारूचा कोणताही फलंदाज जास्तवेळ मैदानावर तग धरू शकला नाही.भारताकडून पहिल्यांदा खेळणारा कुलदीप यादवने चार बळी घेवून कांगारूना मोठे धक्के दिले.यात उमेश यादवने दोन बळी घेतले तर अश्विन,जडेजा, भुवनेश्वर कुमार यांनी एक-एक बळी घेवून कांगारूचा पहिला डाव संपविला. त्याआधी आज सकाळी कांगारूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कांगारूचा अंदाज काहीसा चुकवला.भारतीय सलामीजोडी राहुल व मुरली विजय नाबाद खेळत होते.

उमेश यादवने दोन बळी घेतले तर अश्विन,जडेजा, भुवनेश्वर कुमार यांना एक-एक बळी
भारताचा कर्णधार विराट कोहली खांद्याला दुखापत झाल्यामुळे या कसोटीतून बाहेर राहिला.ही कसोटी दोन्ही संघासाठी महत्वाची आहे.जो ही चौथी कसोटी जिकणार तो मालिका विजयी बनणार आहे.त्यातच विराट नसल्याचा फायदा घेण्यासाठी व नाणेफेक जिकल्यानंतर कांगारूनी फलंदाजीचा निर्णय घेतला.मात्र येथे कांगारू चुकले. भारतीय गोलदांजानी आपल्या अचुक मारा पहिल्या षटकापासून सुरू ठेवला.उमेश यादव याच्या पहिल्या षटकात सलामीवीर मॅट याला 1 धावसंख्येवर क्लिन बोल्ड केले. सलामीवीर डेविड वॉर्नरला कुलदीप यादवने रहाणेद्वारे झेलबाद केले.वॉर्नरने 87 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह 56 धावा केल्या. त्यानंतर उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका देत शॉन मार्श केवळ 4 धावावर बोल्ड केले. पिटर हँड्सकॉम्बला कुलदीप यादवने केवळ 8 धावांवर बोल्ड केले. यानंतर कलदीपने ग्लेन मॅक्सवेललाही 8 धावांवर बोल्ड केले. यानंतर पॅट कमिन्सने (21 धावा) तर स्टीव्ह ओकिफने 8 धावांची भर घातली.यानंतर मॅथ्यू वेड 125 चेंडूत 57 धावा काढून बाद झाला. त्याला जडेजाने टिपले. अखेर भुवनेश्वर कुमारने लायनला 13 धावांवर पुजाराकडे झेलबाद करत कांगारूंचा डाव संपवला.कांगारूचा संपुर्ण संघ 300 धावा करून तंबूत परत गेला.भारतीय संघ खेळण्यासाठी आला असता लोकेश राहुल व मुरली विजय हे दोन्ही फलंदाज शुन्यावर नाबाद खेळत होते.

कांगारूचा अर्ध संघ एकेरी धावात बाद
कांगारूच्या संघाने फलंदाजीला आला असता भारतीय गोलंदाजानी त्यांना अचूक मारा करून त्यांना मोकळे पणाने खेळू देवू दिले नाही.भारतीय गोलदाजीपुढे मॅट 1 धावेवर बाद झाला. तर शॉन मार्श 4,पिटर हॉण्डस्कॅल 8,ग्लेन जेम्स मॅक्सवेल 8,पिटर हँड्सकॉम्ब 8,स्टीव्ह ओकिफन8,हे फलंदाज दुहेरी धावसंख्येपर्यंत पोहचू शकले नाही.त्यावेळी कांगारूचा संघ पहिल्या डावात 300 धावावर संपला. भारतीय गोलंदाजीपुढे कांगारूचे महत्वाचे फलंदाज ऐकेरी धावसंख्येवर गारद झाले.

स्मिथचे मालिकेतील तिसरे शतक ः चौथ्या कसोटी सामन्यात कांगारूचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी करत शतक ठोकले. स्मिथने 152 चेंडूत 13 चौकारासह हे शतक ठोकले. स्मिथचे मालिकेतील हे तिसरे शतक ठरले. तसेच मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाजही ठरला. अखेर स्मिथला आर. अश्विनने 111 धावांवर स्लिपमध्ये रहाणेकडे झेलबाद केले.

पदार्पण करणारा यादव चमकला
धर्मशाला कसोटीद्वारे पदार्पण करणा-या चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने पहिला दिवस गाजवला. कुलदीपने पहिल्या कसोटीच्या डावात 68 धावांत 4 बळी घेतले. सकाळच्या सत्रात जबरदस्त गोलंदाजी करणा-या उमेश यादवने 69 धावांत दोन बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमार, रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनने प्रत्येकी एक-एक बळी घेतला. विराट कोहलीच्या जागी त्याला संघात घेण्यात आल्याने त्याने आपल्या गोलंदाजीतून ते सार्थक ठरविले.