पहुरचे आरोग्यदूतही मदतीसाठी सरसावले

0

जामनेर। तालुक्यातील “आरोग्यदूत” म्हणून ओळख असणारे मूळचे पहुरचे सुपुञ सध्या जामनेरला वास्तव्यास असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंञी अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रफ्फुल रायचंद लोढा यांनी मुख्यमंञी सहाय्यता निधीला १,११,०००[एक लाख अकरा हजार रुपये ] ची मदत केली असुन त्या रक्कमेचा धनादेश आज जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. गोरगरीबांना मदत करायला सतत अग्रेसर असणाऱ्या लोढा यांनी पुन्हा एकदा संवेदनशीलता दाखवून कोरोनाशी लढण्यासाठी आपल्यातला दातृत्वाचा प्रत्यय दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, बिलवाडीचे यशवंत पाटील, पवन लोढा, प्रतिक लोढा उपस्थित होते.