पहुर : शहरातील 35 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रिया राजेंद्र नवघरे (35) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
पहुर पेठ संतोषीमाता नगरातील विवाहिता प्रिया राजेंद्र नवघरे (35) या विवाहितेने शनिवारी सकाळी 11 वाजता आपल्या राहत्या घराच्या वरील मजल्यावर साडीने गळफास झघेतला. मुलगी वैष्णवी (14) ही आई खाली येत नसल्याने वरच्या मजल्यावर गेली असता दरवाजा, खिडकी आतून बंद असल्याने तिने आजी कुसुमबाई नवघरे यांना आवाज दिला. यानंतर पती राजेंद्र नवघरे, शेजारी प्रशांत विठ्ठल कुमावत यांनी धाव घेऊन दरवाजा जोरात ढकलून उघडला असता प्रिया यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पहूर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत यांनी पंचनामा केला. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी डॉ.रवींद्र सुरडकर यांनी दिलेल्या खबरीवरून पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मयत प्रिया यांच्या पश्चात पती, मुलगी वैष्णवी (14), मुलगा पियुष (11) व साई (9), सासू-सासरे असा परीरवार आहे. विवाहितेने आत्महत्या का केली? याचे ठोस कारण अद्याप कळू शकले नाही.