पहुरला नवरात्रोत्सवाला प्रारंभ

0

पहूर । येथे शारदीय नवरात्रोत्सवाला मोठया उत्साहात प्रारंभ झाला. पहूर पेठ आणि कसबे गावातील भवानी देवी मंदिर, संतोषी माता मंदिर, दुर्गादेवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाली. वीस दुर्गादेवी मंडळांनी भव्यदिव्य मुर्त्यांची प्रतिष्टापना केलेली असून उत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कोणतीही अनूचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सांगीतले. रेणूकाई दुर्गा मंडळाने माहूर गडची रेणूकाई प्रतिष्ठापित केली आहे.