पहुरला मजुरांकडून ठेकेदाराला मारहाण : सात जणांविरोधात गुन्हा

पहुर : ऊसतोड करणार्‍या मजूरांनी काम न करता ठेकेदाराकडून पैसे घेत काम न करता शिविगाळ करीत ठेकेदारालाच मारहाण केली. या प्रकरणी पहूर पोलिसात सात मजुरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

ऊस तोड मजुरांनीच केली मारहाण
फकिरा तुकाराम हातागळे (48, रा.तलवाडा, ता.गेवराई, जि.बीड) हे ऊस तोड करण्याच्या कामाचे ठेके घेतात. मंगळवार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील वाकोद रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ पहूर व शेंदुर्णी येथील ऊसतोड मजूर यांना कामावर घेण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी मजूरांना एकुण काम करण्याचे चार लाख रुपये दिले. यावेळी मजुरांनी पैसे घेतले परंतु कामावर जाण्यास नकार दिला आणि फकिरा हातागळे यांच्या ताब्यातील उर्वरीत रक्कम 50 हजार रुपये हिसकावून घेतली तर शिविगाळ व मारहाण केली. याप्रकरणी फकीरा हातागळे यांनी पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी अहमद तडवी, कलीम सलीम तडवी, फकीरा आमीर तडवी, गुलाबर अब्बास तडवी, सांडू मोहताब तडवी, बशीर मेहताब तडवी (सर्व रा.पहूर, ता.जामनेर) व शरीफ सिकंदर तडवी (रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) यांच्या विरोधात पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.