पहुर परीसरातील रस्त्यांची झाली दुरवस्था

0

पहुर। औरंगाबाद रस्त्याची दैन्यावस्था झाली असून रस्त्यात मोठे खड्डे झाले असून या खड्ड्यांमध्ये अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. ख्वाजानगर लागूनच हा रस्ता असल्याने याठिकाणी येणार्‍या जाणार्‍यांचीही वरदळ असते. ह्या पावसाळ्याचे दिवस असले तरी खड्ड्यात झालेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवत असतांना अंदाज येत नाही. परिणामी याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पहुर-औरंगाबाद रोडलगत ख्वाजानगर भागात रस्त्याच्या लगतच सार्वजनिक बांधकाम विभागाने गटारी बांधल्या असून या रोडलगत असलेल्या गटारी अंदाजे खूप खोल आहेत. नळाला पाणी झाल्यानंतर किंवा पाणी पडल्यानंतर या गटारींना नेहमीच पूर येत असतो. परिणामी या गटारीचे पाणी थेट महामार्गावर अथवा रस्त्यावर येते. या साचलेल्या घाण पाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून यामुळे परिसरातील लोकांना साथीच्या आजाराची शक्यता निर्माण झाली आहे व या पाण्यामुळे रस्त्याला खड्डेच खड्डे पडले आहे. तरी संबंधितांनी अपघाताची शक्यता बघता व साथीच्या आजाराची लागण होवू नये यासाठी लक्ष घालून त्वरीत काम करावे अशी एकमुखी मागणी ख्वाजानगर परिसरातील लोकांनी केली आहे.