पहुर । पहुर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षक शंकर भामेरे होते. प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले. हरिभाऊ राऊत यांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवल कोंडे, ईश्वर चौधरी, नेहा देशमुख, पवन चिंचोले, अपेक्षा पाटील, भूषण मगरे, सानिका सोनवणे, प्रतीक्षा पाटील, गौरव लहासे, वैभव वानखेडे, अश्विनी कचवाह यांच्यासह सुमारे 40 विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. सूत्रसंचालन चंदेश सागर यांनी केले. प्रास्ताविक कल्पना बनकर यांनी तर आभार आर.जे.चौधरी यांनी मानले. अश्विनी पाटील, प्रणिता चौधरी, प्रकाश जोशी, सुनील पवार, संजय बनसोडे यांनी सहकार्य केले.