पहुर येथे शिवसेनेचा रास्ता रोको

0

पहूर । पहुर येथे शिवसेनेतर्फे जळगाव – औरंगाबाद महामार्गवर शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांना कर्ज माफी झाली पाहीजे, स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसी लागु करा शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करावे, शेतीमालास हमी भाव जाहीर करावा तसेच नवीन कर्ज मिळावे अशा मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करुन शासनाचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

रास्ता रोको प्रसंगी यांची होती उपस्थिती
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन शिवसैनिक करीत असतांना पोलिसांनी पोलिस बळाचा वापर करत पुतळा आंदोलनकर्त्यांच्या हातून हिसकावून ताब्यात घेतला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पंडीत जोहर, सुकलाल बारी, अशोक जाधव, मुकेश जाधव, विकास जाधव, अमोल पाटील, रमेश बारी, अरुण पाटील, विलास मांडे, संजु किरंगे, संजय पवार, विनोद नाईक, शामराव पाटील, शिताराम वाघ, रविंद्र पांढरे, बातु सोनार, समाधान बावीस्कर, विलास देशमुख, राजु पाटील, सुभाष अप्पार, दत्तु जैन, यांचसह शिवसेना पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी जवळपास तासभर रास्ता रोको झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुस वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ वाहतुक बंद होती. कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये, यासाठी पो.नि.नजीर शेख, पहुर पो.स्टेचे सहाय्यक, पोनि मोहन बोरसे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.