पहूर – गावापासून जवळ असलेल्या खाँजानगर भागाच्या मागील बाजूस एका अनोळखी इसमाचा मृतदेह गुरूवारी सायंकाळी आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, खाँजानगर भागाच्या मागील बाजूस असलेल्या राजू चौधरी यांच्या शेतात (वय-54) या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रविण देशमुख, जितेंद्र परदेशी व अनिल देवरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. मृतदेह जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात ओळख पटविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.