पहुर । येथील पहुरपेठ ग्रुप ग्रामपंचायत मधील वार्ड क्र.6 मधील भाजपा ग्रा.पं.सदस्या खैरुनिसा शे.गणी यांच्या निधनानंतर सर्वसाधारण रिक्त महिला जागेसाठी शिवसेना पुरस्कृत पहुर शहर बचाव पॅनलतर्फे संजय तायडे यांच्या सौभाग्यवती शारदा तायडे यांची उमेदवारी जामनेर येथील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी बी.डी.पाटील यांच्याकडे दाखल करण्यात आली. ही निवडणूक दि.27 मे रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी पहुर शहर बचाव पॅनलप्रमुख पत्रकार गणेश पांढरे, संजय तायडे, विजय पांढरे, विजय पाटील, रवी पांढरे, सुनील सोनार, भिका मराठे, दिलीप पांढरे, विजय देशमुख, रवी देशमुख, माधव बारी, संतोष चिंचोले, रघुनाथ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस युतीतर्फे दि.12 मे रोजी उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.