पहूरमध्ये 3 ठिकाणी धाडसी चोरी; दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण

0

पहूर। येथे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले चोरीचे सत्र थांबता थांबत नसून गुरूवारी मध्यरात्रीनंतर दोन सराफा दुकानांसह एक कृषी केंद्र अशी तीन दुकाने चोरट्यानी फोडून 75 हजारांचा ऐवज लंपास केला. सराफा दुकानात डल्ला मारतांना चोरट्यांनी तेथे उच्छाद मांडत एक लाखाच्या साहित्याचे नुकसानदेखील केले आहे.

एका पतसंस्थेचे कार्यालय फोडण्याचाही प्रय झाल्याने चोरट्यांचा पोलिसांचा धाक वाटेनासा झाल्याच्या संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. फोडण्यात आलेली ही सर्व दुकाने जळगाव राज्य महामार्गाला लागून आहेत. चोरट्यांनी अगोदर ईश्वर ज्वेलर्स या दुकानात हात मारला. तेथून सोन्याची मोड, किरकोळ दागिने आणि चांदीचे भांडे असा 75 हजारांचा ऐवज लंपास केला. एकाच रात्रीत झालेल्या या अज्ञात चोरट्यांनी नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सव्वा महिन्यापासून पहूर परिसरात चोरीच्या लागोपाठ घटना घडत असून पोलिसांना जणू केराची टोपली दाखविली आहे.