पहूर । ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करीत टाळ मृदंगाच्या गजरात महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या पालखी सोहळ्याने अवघी पहूर नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली. प्रति वर्षाप्रमाणे डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा आणि वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात वृक्ष पुजनाने संस्थेचे सचिव भगवान घोंगडे, संचालक शंकर घोंगडे, लक्ष्मण गोरे यांच्याहस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. बसस्थानक, भाजीमंडई, होळी चौक, विठ्ठल मंदीर, महादेव मंदीर, गढी चौक, उभी गल्ली मार्गे दिंडी शाळेच्या प्रांगणात आल्यावर पावल्या, भजन, गायनाने सोहळ्याचा समारोप झाला. दिंडीत टाळमृदंगाच्या गजरात पारंपरिक वारकर्यांच्या वेशात विदयार्थी सहभागी झाले होते.
यांनी घेतले परीश्रम
सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये विठ्ठल-रुख्मिणी, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, भारतमाता यांचे सजीव देखावे लक्ष वेधून घेत होते. पालकांनी पालखी मार्गावर स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव आण्णा घोंगडे, मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे, अजय देशमुख, शिवभक्त रंगनाथ महाराज, हभप शंकर भिवसने, विठ्ठल कोंडे, भागवत बावस्कर, सुभाष नाथ, विकास उभाळे आदींची उपस्थिती होती. कल्पना बनकर, माधुरी बारी, हरीभाऊ राऊत, शंकर भामेरे, भगवान जाधव, चंदेश सागर, अश्विनी पाटील, पल्लवी वानखेडे, राजेंद्र चौधरी, अमोल क्षीरसागर, मनोज खोडपे, संदीप पाटील, यूनूस तडवी, किरण पाटील, गणेश कुंभार, सोनाली शेकोकारे, विदया पवार, प्रकाश जोशी, सुनिल पवार, संजय बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.