पहूर – पहूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चहाच्या दुकानातील चोरी प्रकरणी दोन संशयित तरूणांना पहूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा सुरु होते. दिपक रामदास पाटील वय (२३वर्षे) व सागर अशोक गाढे वय(२४)वर्षे दोन्ही राहणार पहूर अशी त्यांची नावे असुन अजुन काही आरोपी फरारी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गेल्या आठवडय़ात पहूर परीसरात चोर्यांचे सत्रच सुरू असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे,किरण गायकवाड हे करीत आहे.