पहूर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेवर नागरीकांकडून प्रश्‍नचिन्ह

0

पहूर । पहूर पोलिस स्टेशन एरवी कर्तव्यतत्परतेवर तक्रारी दाराच्या तक्रारीवरून तक्रार दाखल करावयास टाळाटाळ होत असल्याने पोलिसांच्या वागणुकीत पोलिस राहीलेच नाही असे अनेक संतप्त प्रतिक्रीया गेल्या महिन्यापासून ऐकावयास मिळत आहे. गेल्या महिन्यात जळगाव पाळधी रोडवर शेतकर्‍याने जाळलेल्या बांधावरील झाड कोसळून दोन तरुणांचा मृत्यु ओढवला असता, त्यावर पहूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदार गेले असता, त्यांना तुमचे कागदपत्र जळगाववरून मागवावे लागतील. म्हणून उडवाउडवीचे उत्तरे पहूर पोलिसांकडून मिळाले असल्याचे मृतकांच्या नातेवाईकांनी सांगितले.

पोलिसांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह
किरकोळ बाबीं समजून जळगाव-औरंगाबाद रोडवर, पाचोरा रोडवर होणार्‍या घटनेत झाकाझाक करून वरिष्ठापर्यंत घटनेवर पद्धतसिरपणे की ठरलेल्या पद्धतीने पडदा टाकला जातो हे सुद्धा एक आव्हान देणारे कोडेप म्हणाले लागेल. अपघातामध्ये ठार झालेल्या व फरार वाहनांचा तपास अवैध मार्गाने चाललेल्या सर्वच यंत्रणेत गुन्हेगारीतले गुंडच असल्याने व गुंडाच्याच संपर्कात वावरत असलेल्या पोलिस खात्याला कुठल्याच भय नसल्याने त्यांनी मागील आठवड्यात एका पत्रकाराला बातम्यांमुळे आमच्यावर काहीही परिणाम होत नसल्याचे खुले आव्हान करून एका पोलिस शिपायाच्या नातवास ट्रकखाली चिरडून मृत्यु झाल्या प्रकरणी पोलिसांना सुगावा लागला नाही. या सर्वच घडामोडींवर वरिष्ठ पारदर्शकता अधिकारीच याला आळा घालतील अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडुन व्यक्त
होत आहे.

प्रतिष्ठितांच्या सुचनेला केराची टोपली
भर चौकात गजबजलेल्या बसस्थानकावर झालेल्या चोरीचा सीसीटिव्ही कॅमेरामध्ये बंदीस्त असलेला चोर अद्याप पकडण्यात पहूर पोलिसांना यश आले नाही. पण अद्याप तक्रार ही दाखल केली नाही. वरिष्ठ पातळीवरून या हालचालींना एक वेगळेच बळ मिळत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. अनेक समस्यांच्या बाबतीत प्रतिष्ठांच्या सुमारे बाजु मांडतांना पोलिसच प्रतिष्ठीतांना कवडी मात्र किंमत समजून त्यांच्या लेखी सुचना किंवा तोंडी सुचना उडवाउडवीचे उत्तरे देऊन टाळल्या जातात. त्यात सर्वच प्रकारचे गुन्हेगारीशी निगडीत असलेले व्यवसाय व त्यांचे हस्तकच तुमचेच कार्यकर्ते म्हणून त्यांना सुद्धा गप्प केले जाते.