पहूर पोलीस स्टेशन आवारात दत्तजयंती साजरी

0

पहूर । येथे पोलीस स्टेशन आवारात असलेल्या श्री.दत्त मंदीरात रविवारी दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त हभप प्रल्हाद महाराज (कळमसरे )यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या हस्ते दत्त मुर्तीची सपत्नीक पूजा करण्यात आली.

भाविकांची मोठी उपस्थिती
महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला. सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे, सहायक फौजदार अनिल अहिरे, सर्व पोलीस कर्मचारी, भजनी मंडळ, पत्रकार बांधवांचे सहकार्य लाभले. भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.