पहूर येथील इसमाची तापी नदीपात्रात आत्महत्या

0

पहूर । जामनेर तालुक्यातील पहूर येथील एका इसमाने मुक्ताईनगर येथे तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पहूर येथील रहिवासी व खोबरेल तेल विकणारे शेनफडू जयराम गायकवाड वय 60 वर्ष असे या इसमाचे नाव आहे. 7 ऑगस्ट पासून बेपत्ता होता. शोधाशोध केली पंरतू काहीही तपास लागले नाही. मंगळवारी 8 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुक्ताई चांगदेव मंदिराच्या संगमावर त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या फिर्यादिवरून मूक्ताईनगर पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहे. शेनफडू गायकवाड यांच्या पश्यात आई, दोन भाऊ असा परिवार आहे.