पहूर येथील जि.प.शाळेत रंगभरण स्पर्धा उत्साहात

0

स्पर्धेत १३६ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
पहूर – येथील संतोषीमातानगर जि.प.शाळेत स्वच्छता अभियानांतर्गत तसेच रुबेला लसिकरण मोहिम जनजागृती बाबत रंगभरण स्पर्धा नुकतीच उत्साहात घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी स्वखर्चाने इयत्ता पहिली ते सातवी च्या सर्व विद्यार्थ्यांना चित्रकलेचे पेपर उपलब्ध करून दिले. स्पर्धा घेण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.१३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे
पहिलीतून प्रथम कुणाल डिगांबर घोटकर, व्दितीय मोनिका सुनिल जुमडे, तृतीय यश समाधान सोनवणे, दुसरी (अ) मधून प्रथम श्रावणी राजु थोरात, व्दितीय कल्याणी प्रकाश उबाळे, तृतीय पियुष राजेंद्र नवघरे, दुसरी (ब)तून प्रथम चंद्रशेखर विनोद चौधरी, व्दितीय प्राजक्ता गणेश तायडे, तृतीय सागर शंकर शेगर, तिसरी (अ)मधून प्रथम कुणाल विजय लहासे, व्दितीय भाविका ईश्वर सोनवणे, तृतीय तेजश्री हिरामण जाधव, तिसरी ब मधून प्रथम ममता संतोष शहाणे, व्दितीय आदित्य राजेंद्र धुळसंधीर, तृतीय मनोज दिपक आणि चौथीतून प्रथम युवराज मनोज कुमावत, व्दितीय दिव्या सुकलाल लहासे तर तृतीय हर्षल चंद्रकांत कुमावत यांचा समावेश आहे.