पहूर । गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाने जाहीर केलेल्या अंतरावरील देशी व विदेशी दारु विक्रीवर निर्णय देवून बंद केले पण? चोरी-चुपके ने दारु विक्रीचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले होते. त्यामुळे पहूर येथील शांतता भंग होईल असे प्रकार दारुच्या नशेतूनच व्हावयास लागल्यामुळे केव्हा वातावरण बिघडले या अवस्थेत सापडलेल्या पोलिस यंत्रणेला अवैध धंद्याच्या विरोधात कठोर निर्णय घेवून पोलिसांच्या हस्तकामार्फत सुचना देवून धंदे बंदचे फर्मान जाहीर केले. कठोर निर्णयाची अंमलबजावणी एपीआय बोरसे यांच्या कारकिर्दीत कदाचित पहिलीच असावी, त्यांनी आपल्या सहकारी सह अवैध धंदे चालवणार्या सट्टा पेढ्या, दारुविक्रीचे व पत्ताक्लब, तसेच बिअरबार वर रात्रंदिवस खडा पहारा देवून अवैध धंदेवाल्यांना नाकी दम केले होते. मात्र सर्वच ठिकाणी वरिष्ठच नजर ठेवतील असे पोलिस खात्यात आढळलेच नाही म्हणून की काय पुन्हा चोरी चुपके हे प्रकार चालुच असून गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्याच्या विरोधात उचललेले ठोस पावलाला धीमी गती मिळत असल्याने पोलिसांच्या वरिष्ठांपर्यंत पाठ थोपटून घेण्यापुरता तर देखावा नसावा असा प्रश्न सर्व सामान्य जनतेतून निर्माण होत असून यावर वरिष्ठांनीच पारदर्शकता दाखवून अवैध धंद्येवाल्यांविरोधात ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे.