पहूर येथे एक दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाची सांगता

0

पहूर । येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयातर्फे जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यात आला. जागतिक किर्तीचे नाटककार व साहित्यिक विल्यम शेक्स्पियर यांचा स्मृतीदिन जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रथमतः विल्यम शेक्स्पियर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले. वाचनालयाचे उपाध्यक्श गावंडे सर यांनी शेक्स्पियर यांच्या जीवनातवर प्रकाशझोत टाकला.

यावेळी सरपंच प्रदिप लोढा, खांजोडकरसर, अ‍ॅड.संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महात्मा फुले पतसंस्थेच्या हाँलमध्ये ग्रंथप्रदर्शन आयोजित करणेत आले. मान्यवरांचे हस्ते प्रदर्शनाचे उद्गघाटन करणेत आले. वाचनालयाचे अध्यक्ष विवेक जाधव यांनी सुत्रसंचलन करुन उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेकरीता ग्रंथपाल सुषमा जाधव, सखाराम शिरसागर, हरिश्चंद्र जाधव, सुरेश चौधरी, ईश्वर घोलप आदिंनी परिश्रम घेतले.