पहूर : पंचायत समिती जामनेर व आर.टी.लेले विद्यालय, पहूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 42 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुमारे 197 विज्ञान उपकरणांची मांडली शिक्षण, विद्यार्थ्यांनी केली. यात प्राथमिक गटातून न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी समर्थ प्रशांत महाजन याने तर माध्यमिक गटातून उटवाले चारुदत्त रणछोड याने प्रथम पारितोषीक पटकावले. डॉ.कलाम नगरीत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जामनेर न.पा.च्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते विज्ञानदिप पेटवून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती आरती लोखंडे या होत्या.
मान्यवरांची कार्यक्रमाला होती उपस्थिती
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य बाबुराव अण्णा घोंगडे, उपशिक्षणाधिकारी मेतकर, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, साहेबराव देशमुख, डॉ.विजय लेले, प्रदर्शनाचे नियोजक तथा शिक्षणाविस्तार अधिकारी विष्णू काळे, शिक्षण विस्तारी अधिकारी व्ही.सी.धनके, रविंद्र दुसाने, सपकाळे, माजी. जि.प.सदस्य राजधर पांढरे, जि.प.सदस्य नामदेव मंगरुळे, केंद्र प्रमुख भानुदास तायडे, रामचंद्र वानखेडे, दिनकर सुरडकर, विठ्ठल सावकारे, समाधान पाटील, शंकर घोंगडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आयोजित कार्यक्रमात स्पर्धांमध्ये प्राथमिक गटातून प्रथम समर्थ महाजन, द्वितीय दिनेश कोळी, तृतीय दिपाली चंदनशिव तर उत्तेजनार्थ मोईनशहा कय्युमशहा पारितोषीकाचे मानकरी ठरले. माध्यमिक गटातून प्रथम उटवाले चारुदत्त रणछोड, द्वितीय जयेश सावकारे, तृतीय अकबर तडवी तर उत्तेजनार्थ दिव्या कुमावत क्रमांक प्राप्त केला. लोकसंख्या शिक्षण, शिक्षकांच्या गटातून जि.प.शाळा खादगावचे प्रथम मुख्याध्यापक प्रभाकर पाटील यांनी क्रमांक प्राप्त केला. माध्यमिक गटातून ललवाणी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक चंद्रकांत कोळी यांनी प्रथम तर सावित्रीबाई फुले विद्यालयाचे शिक्षक शंकर रंगनाथ भामेरे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
शैक्षणिक साहित्यात शिक्षकांच्या गटातून (प्राथ) आर.टी.लेले विद्यालयाचे प्रथम शिक्षक संतोष महाजन, द्वितीय निलेश ताडे तर तृतीय अरुण पाटील यांनी क्रमांक प्राप्त केला. माध्यमिक शिक्षकांच्या गटातून प्रथम रोशन आहेर (न्यू इंग्लिश स्कूल, फत्तेपूर), तृतीय गुणवंत पाटील (क.द.नाईक विद्यालय, पाळधी), तृतीय रमेश भारंबे (ज्ञानगंगा माध्य.विद्यालय, जामनेर) यांनी क्रमांक प्राप्त केला. प्रदर्शनात प्राथमिक गटातून 122 तर माध्यमिक गटातून 58 उपकरणांची मांडणी करण्यात आली. 17 शिक्षकांनीही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारे प्रकल्प वाहण्यासाठी विज्ञान प्रेमींनी तसेच गावातील शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली.
स्पर्धेचे समन्वयक म्हणून एस.टी.चिंचोले यांनी तर परीक्षक म्हणून जे.टी.पाटील, गणेश राऊत, व्ही.जी.भालेराव यांच्यासह विज्ञान शिक्षकांनी काम पाहिले. सुत्रसंचालन विजय बोरसे यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.सी.धनके यांच्या अध्यक्षतेखाली प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्तविक विस्तार अधिकारी विष्णू काळे यांनी तर आभार आर.टी.लेले विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.टी.पाटील यांनी मानले. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.