पहूर। येथील आर.टी. लेले हायस्कूलच्या प्रांगणावर आज झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलांच्या गटात न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपूर विजेते ठरले तर माध्यमिक विद्यालय तोंडापूर उपविजेते ठरले. मुलींच्या गटात माध्यमिक विद्यालय रोटवदने बाजी मारली तर एकलव्य विद्यालय जामनेर उपविजेते ठरले. पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.ए.एम.लेले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
32 संघांचा होता सहभाग
या स्पर्धेत मुलांचे एकवीस तर मुलींचे अकरा संघ सहभागी झाले होते. तालुका क्रीडा समन्वयक प्रा.असिफ़ खान पठाण यांनी स्पर्धेचे समन्वयन केले. आर.टी. लेले विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.टी.पाटील यांनी सहभागी शाळांचे अभिनंदन केले.